शेतकऱ्यांना आता रेशनिंगवरच मिळणार खते

Foto

काळाबाजार रोखण्यासाठी घेतला निर्णय : युरिया, डीएपीसाठी 'एफएफएस' नोंदणी अनिवार्य
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): रासायनिक खतांचा काळाबाजार आणि तुटवडा थांबवण्यासाठी केंद्र सरकारने आता खतांचे रेशनिंग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांनुसार शेतकऱ्यांना प्रतिएकर केवळ दोन बॅग युरिया आणि एक बॅग डीएपी मिळणार आहे. तसेच, खत खरेदी करण्यासाठी 'फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल' या प्रणालीवर पूर्वनोंदणी करणे बंधनकारक नकारक करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना खत खरेदीवर कोणत्याही प्रकारचे रेशनिंग नाही. त्यामुळे शेतकरी
हवे तेवढे खत खरेदी करू शकतो. माफक किमतीमुळे शेतकऱ्यांचा युरियाकडे ओढा असतो. काही दुकानदार युरियाचा काळाबाजार करून अव्वाच्या सव्वा पैसे उकळतात. रेशनिंगमुळे खत खरेदी-विक्रीत पारदर्शकता येण्यास मदत होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. एका हंगामासाठी
अॅप डाऊनलोड करा
▶ शेतकऱ्याला प्ले स्टोअरवरून एफएफएस अॅप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर फार्मर आयडी टाकून लॉगिन करायचे आहे. लॉगिन केल्यानंतर संबंधिताच्या नावावर कोणत्या ठिकाणी किती क्षेत्र आहे, हेही त्यात दिसेल. त्यानुसार त्याने युरिया आणि डीएपीची मागणी नोंदवायची आहे. ती नोंदवल्यावर ओटीपी येईल. तो सांगितल्याशिवाय खत मिळणार नाही. जिल्ह्यातील सुमारे तीन हजार किरकोळ खतविक्रेते आहेत, तर ३०० घाऊक विक्रेते आहेत. त्यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी अॅपविषयी मार्गदर्शन केले.
केवळ दोन गोण्या युरिया आणि एक गोणी डीएपी मिळेल. त्याव्यतिरिक्त त्याला हे खत मिळणार नाही. मात्र, इतर खतांसाठी
त्याला रेशनिंग नसेल. नोंदणीनंतर त्याने खत खरेदी केले नाही, तर ती आपोआप रद्द होईल.